सर्वं मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

जगदंबा भक्तनिवास

जगदंबा भक्तनिवास हे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोय रास्त दारात जगदंबा देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे. सुमारे ४० खोल्या असलेले भक्तनिवास नवरात्रीकाळात घटी बसणाऱ्या भाविकांसाठी खुले करण्यात येते. प्रशस्थ अशा खोल्या आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय पिण्यासाठी थंड पाणी अश्या सोयी संस्थाना तर्फे पुरविल्या जातात.

जगदंबामातेचे मंदिर

जगदंबामातेचे मंदिर नवरात्र उत्सवात दीपमाळांनी झळाळून निघते. अनेक मान्यवरांच्या हस्ते नवरात्रीमध्ये आरती केली जाते.

भक्तनिवास खोली

जगदंबा देवस्थान ट्रस्ट आवारात ४० खोल्यांचे सुसज्ज असे भक्तनिवास असून प्रत्येक खोलीमध्ये ४, ६ या प्रमाणे माणसे निवास करू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

जाहीर लिलाव

श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट, कोटमगाव येथे नवरात्र उत्सवात जमा झालेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव ता. २९/१०/२०१५ व ता. ३०/१०/२०१५ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा